पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'किल्ले रायगडसाठी २० कोटी मंजूर, बळीराजासाठी २ दिवसांत मोठी घोषणा करु'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील तमाम जनतेला अत्यंत नम्रपणे नमस्कार करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर जनतेचे आभार मानले. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे असेल, कोणालाही दहशत वाटेल असे वातावरण निर्माण होणार  नाही, याची काळजी घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पहिल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडचा प्रस्ताव माझ्यासमोर आला. रायगडच्या संवर्धनाचे काम जवळपास ६०० कोटींचे आहे. आतापर्यंत २० कोटी देण्यात आले होते. त्यानंतर आमच्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, छत्रपतींच्या राजधानीसाठी पहिला निर्णय घेणं हे मी माझ्या भाग्य मानतो, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

 

महाराष्ट्रात ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान

याशिवाय पहिल्या बैठकीत अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भाती मुद्दा केंद्रस्थानी होता, असे ते म्हणाले. हातामध्ये काही नव्हते तेव्हा शेतकऱ्यांना फक्त दिलासा दिला. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी ज्या-ज्या योजना जाहीर झाल्या त्याचे वास्तव चित्र जाहीर करावं यासंदर्भातील आदेश मुख्यसचिवांना दिले आहे. शेतकऱ्यांसाठी तुटपूंजी मदत करायची नाही. त्यांच्यासाटी  भवदिव्य करण्याचा विचार नाही तर निश्चय आहे. दोन दिवसांत आम्ही यासंदर्भात निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.  

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर फडणवीसांची पहिली टीका

मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र देण्यात आलं. मात्र प्रत्येक्षात त्याच्या खात्यामध्ये पैसे गेले नाहीत. पीक विमा योजनाही फोल ठरली. याचा आढावा घेऊन शेतकऱ्याला मदत करणार आहोत. आमच्या मंत्रिमंडळाकडून शेतकऱ्याची निराशा होणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. विदर्भासाठी एकसूत्री कार्यक्रमात तरतूद नाही, असे फडणवीसांनी म्हटले होते. यावर मंत्रिमंडळ हे विभागाचे नसते तर राज्यासाठी निर्णय घेत असते. त्यांनी यासंदर्भात अभ्यास करुन बोलावे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra CM Uddhav Thackeray after first cabinet meeting we Rs 20 Crores for the development of Raigad an take a decision for farmers in the next two days