पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शहांच्या भेटीसाठी फडणवीस दिल्ली दरबारी जाणार

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तरी सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. ५०-५० फॉर्म्युला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री या मुद्यावरुन भाजप-शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान सत्तास्थापनेवरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्ली दरबारी भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील ओला दुष्काळ आणि राजकीय परिस्थिती यादृष्टिने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

'शोले' चित्रपटातील किस्सा सांगत भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

एएनआयच्या वृत्तानुसार, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना केंद्राकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट घेणार आहेत. यावेळी राजकीय मुद्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना यांच्यातील तणावाच्या वातावरणानंतरही आम्ही स्थिर सरकार देऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.  दुसरीकडे सरकार स्थापनेबाबत सर्व गोष्टी लवकरच जनतेसमोर येतील, अशा भाषेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला आहे.  

जय महाराष्ट्र! संजय राऊत यांचा अजित पवारांच्या फोनवर मेसेज

उल्लेखनिय आहे की, यासर्व घडामोडीत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना जय महाराष्ट्र असा मेसेज पाठवून भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात काय चर्चा होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.