पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपचा प्रचाराचा नवा फंडा; मॉर्निंग वॉकद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस राहिल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने प्रचार सुरु आहे. भाजपने आता 'मुंबई चालली भाजपसोबत' असं अभियान राबवून प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपच्या नेत्यांसह सर्वच पदाधिकारी या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक करत प्रचार केला.

मुंबईतील चर्नीरोड येथे इमारतीला भीषण आग

कुलाबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राहूल नार्वेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी राहूल नार्वेकर आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. रविवार असल्याने मॉर्निंग वॉकला मरिन ड्राईव्हला नागरिकांची मोठी गर्दी होती. याचाच फायदा घेत भाजपने प्रचाराचा हा नवा फंडा हाती घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. 

'मंदी असती तर चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली नसती'

दरम्यान, शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी देखील वांद्रे पश्चिम येथे मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला. तसंच नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी चारकोप येथे आणि भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व येथे मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला. 

खड्डयात जाण्याची सवय लावून घेऊ नका!