पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता संघर्षाच्या कसरतीमध्ये मुख्यमंत्री सरसंघचालकांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाठी गेले आहेत. याशिवाय यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भयाजी जोशी हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते. या वृत्तामुळे भाजप-शिवसेना यांच्यातील तिढा सोडवण्यासाठी संघ मध्यस्थी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

युतीवर गिरीश महाजन म्हणाले, आपण हिंदुस्थान-पाकिस्तान नाही

उल्लेखनिय आहे की, यापूर्वी दिल्ली दरबारात जाऊन मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच राज्यात नवे सरकार स्थापन होणार असल्याचे राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले असल्याचे सांगत शिवसेनेसोबत चर्चेसाठी भाजपचा राज्यातील कोणताही नेता पुढाकार घेणार नसल्याचे संकेतही यावेळी भाजपकडून देण्यात आले आहेत. फडणवीसांच्या संघ मुख्यालयातील भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह राज्यातील सत्ता स्थापनेमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.   

शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची मदत द्या: अजित पवार

भाजपने शिवसेनेच्या कोर्टात टाकलेल्या चेंडूवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील संबंध सलोख्याचे असल्यामुळे संघाकडून शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न होणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis reaches RSS Nagpur Headquarters to meet RSS Chief Mohan Bhagwat