पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींच्या भेटीशिवाय CM फडणवीसांना राज्यात परतावे लागले

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी

राज्यात राजकीय तिढा निर्माण झालेला असताना दिल्ली दरबारी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे वृत्त होते. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत तब्बल ४० मिनिटे चर्चा केल्यानंतर फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली होती. या दिग्गज नेत्यांच्या भेटीनंतर फडणवीस महाराष्ट्रात परतण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार होते. मोदी परदेशी दौऱ्यावर असल्यामुळे फडणवीसांची त्यांच्यासोबतची भेट नियोजित नव्हती. मात्र पंतप्रधान मोदी मायदेशी परतल्यानंतर रात्री उशीराने पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीस त्यांची भेट घेणार असल्याचे चर्चा रंगली होती. मात्र पंतप्रधानांच्या भेटीशिवायच मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने निघाल्याचे वृत्त 'एबीपी माझा' या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात होती.  

सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की...

यापूर्वी राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. राज्यातील शेतीच्या नुकसानीचा सर्वंकष माहिती अहवाल शहांना दिल्याचे त्यांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता समीकरणावर मौन बाळगत युतीचा उल्लेख न करता महाराष्ट्रात लवकरच नवे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. 

सरकार स्थापण्यासाठी भाजपला आणखी वेळ मिळण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील आहेत. सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणामुळे मुख्यमंत्र्यासमोर मोठा पेच निर्मा झाल्याचे चित्र आहे. विधानसभेच्या निवडणुकांवेळी एका व्यासपीठावरुन महायुतीचा प्रचार करणाऱ्या भाजप-सेनेमध्ये दरी निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या ठाम भुमिकेमुळे फडणवीसांची कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे मोदींची भेट त्यांना थोडे बळ मिळण्यास निश्चित पूरक ठरली असती.