पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा बारामतीकर तुम्हाला पुरुन उरेल!- शरद पवार

शरद पवार

सत्ता परिवर्तन झाले पाहिजे ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. समाजातील एकही घटक राज्य सरकारवर समाधानी नाही. त्यामुळे संतापलेली जनता आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील प्रचारसभेत व्यक्त केला. 

'अरे ला कारे' म्हणण्याची धमक ठेवा, राज ठाकरेंचे आवाहन

माझ्या लहानपणी आपल्याकडे उरसाच्या कुस्त्या व्हायच्या आजही होतात. यात मोठ्या पैलवानाला इनाम मिळायचे. सहा ते नऊ वर्षांच्या कुस्ती खेळणाऱ्या  मुलांना पैलवानाला कुस्त्ती मारल्यानंतर रेवड्या मिळायच्या. आम्ही रेवड्यावाल्या पैलवनांशी लढत नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी घरच्या मैदानातून मुख्यमंत्र्यांवर टोला लगावला. 

महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. मी देशाच्या क्रिकेट संघाचा, कबड्डी खो-खो संघाचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आमच्यासोबत पैलवानाच्या गोष्टी करु नका, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले.  पाच वर्षात तुम्ही काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याबद्दल राज्य सरकारला लाज वाटायला हवी, असेही ते म्हणाले. 

अमित शहांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, कर्जत-जामखेडची सभा रद्द

केंद्रसरकाने उद्योगपतींसाठी ८१ हजार कोटींची मदत केली. शेतकऱ्यांवर जप्ती आणली जाते. हे सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेचे हित जपणारे नाही. तर ते उद्योगपतींना साह्य करणारे आहेत, असा आरोपही पवारांनी केला. अमित शहा हे देशाचे देशाचे गृहमंत्री आहेत. सोलापूरात त्यांनी माझ्याकडे हिशोब मागितले. पाच वर्षांच्या पूर्वी अमित शहा तुम्हाला माहित होते का? असा प्रश्न बारामतीकरांना विचारत शरद पवारांनी शहांवर तोफ डागली. जर कामे केली नसती तर ५२ वर्ष लोकांनी निवडून दिले नसते. शहा सत्तेचा गैरवापर करतात असा आरोपही यावेळी पवारांनी केला. सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. माझ्यावर कितीही खटले भरा, पण हा बारामतीकर तुम्हाला पुरुन उरेल, अशा भाषेत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly elections 2019 sharad pawar slams cm cm devendra fadnavis and maharashtra assembly elections in baramati