पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घटस्थापनेच्या मुहूर्तावर आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

आदित्य ठाकरे

भाजपसोबतच्या युतीपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप केले. त्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुक लढवणार की नाही? याबाबत सुरु असलेल्या चर्चेला देखील पूर्णविराम  दिला. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

युतीपूर्वीच शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्मचे वाटप

शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे घराण्यात कोणीच निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे ठाकरे घराण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आदित्य ठाकरे हे पहिली व्यक्ती आहेत. युवा वर्गाला एकत्र करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला.  

काँग्रेस एक पाऊल पुढे! विधानसभेसाठी ५१ उमेदवारांची पहिली यादी

'आदित्य संवाद' आणि 'जनआशीर्वाद यात्रा' या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील युवकांशी संवाद साधला होता. तेव्हापासून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. २ किंवा ३ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Maharashtra Assembly Elections 2019 Sena fields its CM face Aaditya Thackeray from Worli seat in Maharashtra