पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत चौथी भाषा आणाल तर याद राखा! पुन्हा मराठीचा मुद्दा..

राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुंबईतील पहिल्या सभेत विरोधी बाकावर बसायचे बळ मागणाऱ्या राज ठाकरेंनी भांडुमधील सभेत जनतेच्या मौनावर भाष्य केले. जनता सरकारला प्रश्न विचारत नाही, त्याचा सत्ताधारी भाजप सेना फायदा घेत आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसवाले भुरटे चोर तर भाजपवाले डाकू : प्रकाश आंबेडकर

लोकसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' असे म्हणून सत्ताधाऱ्यांचे पितळं उघडे पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या जाहीरनाम्यातील वचनाचे वाचन करत यातील काय कामे झाली? त्याचा विचार करा, असे जनतेला सांगितले. मनसे सैनिकांनी छेडलेल्या आंदोलनामुळे राज्यातील ७८ टोलनाके बंद झाले. सरकारने सत्तेत आल्यावर आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करणार असे आश्वासन दिले. मात्र आजही टोल वसूली सुरु आहे. मनसेमुळे मोबाईलमध्ये मराठीला प्राधान्य मिळाले. पूर्वी इंग्रजी आणि हिंदी भाषेत संदेश यायचे. मनसेच्या दणक्यानंतर मोबाईल कंपन्यांनी मराठी भाषेचा वापर सुरु केला, असे सांगत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा छेडल्याचे पाहायला मिळाले.

चंद्रपूरमध्ये दारूबंदी हटलीच पाहिजे; महिला उमेदवाराचा अजब प्रचार

मुंबईत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेशिवाय चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर याद राखा! असा इशाराही त्यांनी दिला.  
रस्त्यावर खड्डे पडत चालले आहेत. मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या. याला जबाबदार कोण? अशा प्रश्न विचारत त्यांनी शिवसेना-भाजप सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. नगरसेवक, आमदार म्हणून निवडून येणारे लोकप्रतिधी  सरकारला प्रश्नच विचारत नाहीत. नागरिकही सुस्त आहेत. त्यामुळे सरकारचे फावते. मला सरकारवर अंकुश ठेवायचा आहे. मला मतदान विरोधी पक्षात बसण्यासाठी करा, असे आवाहन त्यांनी केले.