पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'महापुरात स्थानिक मदतीला धावले अन् सरकारने श्रेय लाटले'

जयंत पाटील

सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूरावेळी पाच दिवस सरकार इकडे फिरकले नव्हते. सहाव्या दिवशी सरकार मदतीला आले. २ लाख ८० लोकांना विस्थापित केल्याची घोषणा केली. पुरात अडकलेल्या नागरिकांना कृष्णा-वारणा काठच्या स्थानिकांनीच मदत केली. पण याचे सर्व श्रेय सरकारने लाटले, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लापूरमधील प्रचार सभेत ते बोलत होते.    

'सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज'

आमच्या सरकारला भ्रष्ट म्हणणाऱ्या भाजपला पाच वर्षात आमच्यावरील आरोप सिद्ध करता आलेला नाही. पाच वर्षात फडणवीस सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे लोकांना काय सांगायचे म्हणून राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याची टिमकी वाजवली गेली. राज्य सहकारी बँक प्रकरणात दिल्लीतून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव गोवण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.  

'PMC बँक घोटाळ्यात कुणाचे नातेवाईक? मोदींनी उत्तर द्यावे'

मंदीवर भाष्य करताना जयंत पाटील यांनी फडणवीस-मोदी जोडीमुळे अर्थव्यवस्था कोलमडल्याचे सांगितले. इतर राज्यातील तुलनेत राज्याची अर्थव्यवस्था का कोलमडली? याच उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने भाजपचा टि शर्ट घालून आत्महत्या केल्याची घटना सांगत त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा देखील सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly elections 2019 ncp leader Jayant Patil target bjp and fadnavis government