पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

bjp shivsena : सोशल मीडियावर हास्याचा ५०-५० फॉर्म्युला

सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

 निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटला. युती म्हणून एकमेकांसोबत चालणाऱ्या भाजप- शिवसेनेत आता सत्तेसाठी ठिगण्या पडू लागल्या आहेत. भाजप-शिवसेनेकडून मंगळवारी दिवसभर एकमेकांना डिवचणारी वक्तव्ये केली जात होती. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा ५०-५० फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेने सरकार स्थापनेनिमित्त आयोजित भाजपबरोबरील बैठकच रद्द केली.

'भाजपचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरेंना फोन करणार'

जोपर्यंत ५०-५० फॉर्म्युल्यावर तोडगा दिसत नाही तोपर्यंत हेवे दावे, आरोप प्रत्यारोपाचं चित्र कायम राहणार आहे. इथे राजकारणात  ५०-५० फॉर्म्युल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर   दोन्ही पक्षातील सद्य परिस्थिवर  हास्याचे एका पेक्षाएक फॉर्म्युले व्हायरल होत आहेत.

सरकार स्थापन करण्याच्या समीकरणावरुन भाजप आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर अडून बसलेल्या शिवसेनेचे समाधान करण्यासाठी भाजप आता एक नवा फॉर्म्युला आणण्याचा विचार करत आहे 

IND vs BAN : ...म्हणून सामन्यांच्या तिकिटांची किंमत सर्वांत कमी