पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या प्रचारसभेत तो 'निकम्मा' कुठं होता, निरुपम यांचे टि्वट

संजय निरुपम

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षविरोधी वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती. आता त्यांनी आणखी एक विधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पक्षाने काहीही निर्णय घेऊद्यात मी काँग्रेस सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मी कोणत्याही पक्षात जाऊ इच्छित नसल्याचे त्यांनी एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला मुंबईच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यामुळे खूप दुःख झाल्याचेही ते म्हणाले. तत्पूर्वी, त्यांनी आपल्या टि्वटमध्ये राहुल गांधी यांच्या रविवारच्या प्रचार रॅलीत तो निकम्मा अनुपस्थित का होता, असे कोणाचेही नाव न घेता सवाल केला आहे. त्यांच्या या टि्वटमुळेही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नाव कोणाला माहिती होते का? - शरद पवार

पक्षात काहीही चुकीचे झाले तर मी बोलणार. मी बिनधास्त आणि निडर आहे. सध्या काँग्रेस वाईट अवस्थेतून जात असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

तत्पूर्वी, निरुपम यांनी आज (सोमवार) एक टि्वट केले. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या मुंबईतील प्रचारसभेतील माझ्या अनुपस्थितीबद्दल जी चर्चा सुरु आहे, ती चुकीची आहे. एका घरगुती कार्यक्रमात मी व्यग्र होते. राहुल गांधींना मी याची कल्पना आधीच दिली होती. ते माझे नेते आहेत आणि नेहमीच राहतील. पण तो निकम्मा अनुपस्थित का होता?, असे टि्वट त्यांनी केले.

कुठल्याही परिस्थितीत सत्ता येणार: उध्दव ठाकरे

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपामुळे नाराज असलेल्या निरुपम यांनी काँग्रेसवर आरोप करत काही जागा वगळता महाराष्ट्रात पक्षाची अनामत रक्कम जप्त होईल, असे भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, मला वाटत नाही की मी काँग्रेस सोडेन. पण जर पक्षांतर्गत काही चुकीचे सुरु असेल तर पक्षापासून मी दीर्घकाळापर्यंत लांब राहू शकणार नाही. मी निवडणूक प्रचारात भाग घेणार नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election I will not leave Congress no matter what party decides says Sanjay Nirupam