पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा निवडणूक : प्रचार तोफा आज थंडावणार, आता वेध मतदानाचे

विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सर्वच राजकीय पक्षांचा सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. येत्या सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचारसभा, बाईक रॅली, पदयात्रा, सोशल मीडिया या सर्वच माध्यमातून राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आता मतदारांना आपला निर्णय घेऊन सोमवारी मतदान करायचे आहे.

तुरुंगाऐवजी रमेश कदम ठाण्यातील फ्लॅटमध्ये, तिथूनच लाखोंची रोकड जप्त

राज्यातील लढत प्रामुख्याने भाजप-शिवसेना युती विरूद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यामध्ये होते आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष कशी कामगिरी करतात हे पाहणे सुद्धा उत्सुकतेचे असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. उमेदवारी कोणाला मिळणार, कोणाचे तिकीट कापले जाणार याची चर्चा सुरू झाली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी पक्षाच्या आदेशाविरोधात बंडखोरी केली. यापैकी काही बंडखोरांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर आपल्या तलवारी म्यानही केल्या. तर अनेकांनी आपले बंड कायम ठेवले.

प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जाहीर सभा घेतल्या. यामध्ये त्यांनी सातारा, पुणे, परळी, मुंबई या ठिकाणी घेतलेल्या सभा गाजल्या. तर दुसरीकडे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यात घेतलेली सभा अनेकांच्या मनात घर करून गेली. वयाच्या ८० वर्षी शरद पवार यांनी घेतलेल्या या सभेची चर्चा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात रंगली. शरद पवार यांनीही गेल्या दोन आठवड्यात राज्यात झंझावती प्रचार दौरा केला.

सातारा सभा : मुसळधार पावसात उदयनराजेंवर कडाडले शरद पवार

भाजचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या सभांमधून शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमध्येही त्यांनी सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचताना विरोधकांवर जोरदार टीका केली. कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा भाजपच्या प्रचाराच्या अजेंड्यावर होता. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. कलम ३७० रद्द करणे आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक याचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 

राहुल गांधी यांनी प्रचारात उशिरा सहभाग घेतला असला तरी त्यांनी आपल्या सभांमधून भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाहीर सभा घेत विचार करून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. त्यांनीही आपल्या सभांमधून भाजप सरकारवर जोरदार हल्ला केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election campaign will end by today 5pm now voting on 21 october 2019