महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या उलाढाली सुरु आहेत. सोमवारी शिवसेनेला राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागली. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दिवसभर काथ्याकूट झाला. पण काँग्रेस निर्णय घेऊ शकली नाही. तिकडे राज्यपालांनी ही मुदतवाढ नाकारली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकवाक्यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा शक्य नसल्याचे म्हटले आहे.
सोमवारच्या घडामोडींनंतर संजय राऊत यांचे लीलावतीतून सूचक ट्विट
काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत निवडणूक लढवली. त्यामुळे आम्हा दोघांना एकत्रच निर्णय घ्यावा लागेल. सोमवारी आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. पण त्यांचे आमदार जयपूरमध्ये आम्ही इकडे, त्यामुळे लवकर संवाद होत नाही. काँग्रेस सोबत आलीच तरच मार्ग निघू शकतो.
Ajit Pawar,NCP: Whatever decision will be taken will be taken collectively, so we were waiting for Congress response yesterday but it didn't come, we can't decide on it alone. There is no misunderstanding,we contested together and are together. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/KCkIJYFMpJ
— ANI (@ANI) November 12, 2019
स्थिर सरकारसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकवाक्याता असायला हवी. यासाठी किमान समान कार्यक्रम आखावा लागेल. आम्हाला जनतेला, माध्यमांना यामागचे कारणही सांगावे लागेल.
'महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे'
जो काही निर्णय होईल तो एकत्रितपणे होईल. यासाठी आम्ही सोमवारी काँग्रेसशी संवाद साधला होता. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. आम्ही एकटयाने हा निर्णय घेऊ शकत नाही. आमच्यात काही गैरसमजही नाही. आम्ही एकत्रित लढलो होतो आणि अजूनही एकत्रितच आहोत, असेही पवार म्हणाले.