पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेईल का, शरद पवारांचा सवाल

शरद पवार

देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि शिवसेनेने त्यांना पाठिंबा द्यावा, असा नवा फॉर्म्युला मांडला होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेईल का, असा सवाल उपस्थित केला आहे. रिपाइं प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शरद पवार हे संयुक्तरित्या पत्रकरांना सामोरे गेले, त्यावेळी ते बोलत होते. सरकार स्थापन झाले नाहीतर फेरनिवडणुका लगेच होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल भाजपला सत्ता स्थापण्याचा अधिकार का देत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंचा निर्णय आमच्यासाठी अंतिमः एकनाथ शिंदे

शिवसेना-भाजपमधील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आठवले हे पवारांच्या भेटीला त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी गेले होते. त्यानंतर माध्यमांशी दोघांनी संवाद साधला. सत्ता स्थापण्यात उशीर होत असल्यामुळे त्याचा राज्यातील अर्थव्यवस्थेबरोबर इतर घटकांवर परिणाम होत असल्याची चिंता पवार यांनी व्यक्त केली आहे.

पवार म्हणाले, दोन्ही पक्षांनी समंजसपणा दाखवावा आणि राज्यातील अस्थिरता घालवावी. सध्या राज्यात स्थिरता येईल याची काळजी घेतली जावी. जनतेचा कौल युतील आहे. त्यांनी सरकार बनवावे. यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये आठवलेंनी मध्यस्थी करावी. 

यमराज वाचवणार रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांचे प्राण

जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा तर सेना-भाजपला सत्ता स्थापण्याचा कौल जनतेने दिला आहे. त्यांनी सरकार बनवले पाहिजे, असे ते म्हणाले.

रामदास आठवलेंविषयी पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील परिस्थिती दुरुस्त व्हावी. इतक्या दिवस अशी परिस्थिती राहू नये, याबाबत आमच्या दोघांचे एकमत झाले आहे. राष्ट्रीय राजकारणात आठवलेंचे वेगळे स्थान आहे. त्यांनी मांडलेल्या मतांची दखल घेतली जाते. त्यांनी मी सल्ला देण्याची सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 will congress accept shiv sena support sharad pawar asks questioned