पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक कोणाशी लढायची, देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समोर कोणी पैलवान नाही, निवडणूक लढायची कोणाशी, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिरपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. काँग्रेसची तर अवस्थी इतकी वाईट झाली आहे की, इकडे निवडणूक लागली आहे, आणि त्यांचे नेते बँकॉकला गेले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला

BLOG : ब्राह्मण म्हणून कोण विचारतो?

दरम्यान, यावेळी शिरपूरचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री अमरीश पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. पटेल यांचे समर्थकही मोठ्या संख्येने भाजपमध्ये आले. 

विरोधकच राहिला नसल्याने निवडणूक कोणाशी लढायची असा खोचक सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्याची (शपथनामा) खिल्ली उडवली. ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच हार मानली आहे. सत्तेवर येणार नसल्याचे विरोधकांनी आधीच मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी कसलीही आश्वासने दिली आहेत. आता ते आम्हाला निवडून द्या प्रत्येकाला ताजमहल बांधून देऊ इतकेच म्हणायचे शिल्लक राहिले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

महाराष्ट्र आम्हीच घडवणारः उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Who to fight for the election cm devendra fadnavis ask question in dhule election campaign