पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना कलम ३७० बाबत प्रश्न विचाराः अमित शहा

अमित शहा

जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कोल्हापुरात कलम ३७० आणि तिहेरी तलाकचा मुद्दा आळवला. गेल्या ७० वर्षांत काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची हिंमत नव्हती पण ५६ इंच छातीच्या पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा सत्तेवर येताच कलम ३७० हटवले. पण काँग्रेस-राष्ट्रवादीने त्याला विरोध केला. कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुम्ही कलम ३७० बाबत तुमची भूमिका काय असा, जाब विचारा, असे आवाहन अमित शहा यांनी मतदारांना केले. महायुतीच्या संयुक्त प्रचारसभेत कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक अनुपस्थित होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.  

जगात सर्वांधिक सुखी मुसलमान भारतात, कारण..: मोहन भागवत

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी कलम ३७० उखडून टाकले. एका देशात दोन कायदे असू शकत नाही. पण राहुल गांधी आणि शरद पवार यांचा त्याला विरोध होता. काँग्रेसच्या काळात काश्मिरी तरुणांच्या हाती बंदुका दिल्या.  तिहेरी तलाकलाही काँग्रेसने विरोध केला. 

पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राइक केले, एअर स्ट्राइक केले. त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. हे चांगले केले की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. राहुल गांधी म्हणतात तुम्ही जवानांच्या रक्ताची दलाली करता, असा आरोप करतात. यूपीएच्या काळात दहशतवाद्यांनी देशात धुमाकूळ घातला होता. 

'खरा पैलवान कोण हे २४ तारखेला जनता दाखवेल'

मोदी सरकारने उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. तिहेरी तलाकविरोधातही भाजपने कायदा केला, असेही ते म्हणाले. 

कोल्हापूर, सांगली येथील महापुराचा आपल्या भाषणात उल्लेख करताना त्यांनी निवडणुकीनंतर पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच आश्वासन दिले. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

'मंदी असती तर चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली नसती'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 When Congress and NCP leaders come here for campaign do ask them about their stand on Article 370 says amit shah