पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त', शिवसेनेबरोबरील आघाडीवर अबू आझमींचं मत

अबू आझमी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटकपक्षांनी शिवसेनेबरोबर जाण्यास हिरवा कंदील दिला आहे. काँग्रेस आघाडीचा घटकपक्ष समाजवादी पक्षानेही शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, अशी संवादफेक करत सपाचा सेनेला पाठिंबा असेल असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. आजच्या बैठकीत सर्वच घटक पक्ष राजी झाले असल्याचे ते म्हणाले. 

५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री; तिन्ही पक्षांची सहमती: संजय राऊत

सध्या किमान समान कार्यक्रमावर काम सुरु आहे. त्यात आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मांडल्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे समाजातील सर्व घटकांसाठी असावे. सांप्रदायिकता संपुष्टात आली पाहिजे. ही आघाडी विकासासाठी झाली आहे. मुस्लिम आरक्षणाची आमची मागणी आहे. समाजवादी पार्टी शेतकऱ्यांबरोबर आहे.

केईएममधील प्रिन्सची मृत्यूशी झुंज अपयशी

शिवसेनेला पाठिंबा पाहिजे असेल तर त्यांना त्यांच्या नितीत बदल करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले. मित्रपक्षांची सहमती झाली आहे. आतापर्यंत समोरासमोर बैठक झाली नव्हती. आता त्याची सुरुवात झाली आहे. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला; गुजरात पोलिसांचा दावा