जनतेने आम्हाला विरोधात बसण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. आम्ही आमचे काम कार्यक्षमतेने करु, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते बारामती येथे बोलत होते.
जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाहीः शरद पवार
विधानसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामती येथे आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. ते इथे दुपारी सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेणार आहेत.
Sharad Pawar, Nationalist Congress Party (NCP) President, in Baramati: Our role is, that people have given us the opportunity to sit in the Opposition and not form the govt. We will carry out our work efficiently. #Maharashtra pic.twitter.com/Tyrubj6ghJ
— ANI (@ANI) October 25, 2019
पवार म्हणाले की, जनतेने आम्हाला विरोधात बसण्याची भूमिका दिलेली आहे. आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही. जनतेने जे काम आम्हाला दिले आहे, ते आम्ही कार्यक्षमतेने पार पाडू.
धनं'जय' भाऊच ठरले भारी, पंकजा मुंडेंची हॅट्ट्रिक हुकली!
तत्पूर्वी, पवार यांनी प्रथमच निवडून आलेल्या तरुण आमदारांना सल्ला दिला आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांनी मुंबईत जाऊन फिरत बसू नये. त्याऐवजी ग्रंथालयात जावे. वरिष्ठ नेत्यांची भाषणे वाचावीत. प्रभावी संसदपटू कसं होता येईल हे पाहावं,' असा सल्ला पवार यांनी दिला.