पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

थोडं थांबा, ८ तारखेला दसरा मेळाव्यातच बोलेनः उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

शिवसेनेत जागावाटपानंतर सुरु झालेले नाराजी नाट्य अजून संपुष्टात आलेले नाही. काही ठिकाणी राजीनामे दिले जात आहेत तर काही ठिकाणी बंडखोरीचे संकेत दिले जात आहेत. याचदरम्यान शिवसेनेत अजूनही प्रवेश होत आहेत. काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य नंदूरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांनी थोडं थांबा, ८ तारखेला दसरा मेळाव्यात मी बोलेन, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. 

भाजपकडून नरेंद्र मोदींच्या जाहीर सभांचे प्लॅनिंग, अमित शहांच्या जास्त सभा

नंदूरबारमध्ये पक्षाचे थोडेसे दुर्लक्ष झाले. पण आता यापुढे असे होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीविषयी बोलताना ते म्हणाले की, आदित्य हा माझ्यापेक्षाही जास्त मेहनत करतो. ठाकरे घराण्याची सेवा करण्याची परंपरा आहे. आदित्यच नव्हे तर युवा पिढीने पुढे येऊन देश घडवला पाहिजे असेही त्यांनी म्हटले. 

... म्हणून राज्यात शिवसेना छोट्या भावाची भूमिका निभावण्यास तयार

युतीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, थोडं थांबा, अर्ज भरुन होऊ द्यात. काही ठिकाणी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मी शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे येत्या ८ तारखेला दसरा मेळाव्यात सर्व काही बोलेन.

शिव वडापाव नाही तर खमंग ढोकळा घ्या; आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 wait i will all speak in dasra melava on 8th October says uddhav thackeray