पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: 'मियाँ मियाँ भाई' गाण्यावर खासदार ओवेसींचा डान्स

'मियाँ मियाँ भाई' गाण्यावर खासदार ओवेसांचा डान्स

एमआयएमचे पक्षाचे प्रमुख खासदर असुद्दीन ओवेसींचा डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका निवडणूक प्रचारावेळी मंचावरुन उतरताना ते डान्स करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निवडणूक प्रचारासाठी ते औरंगाबादला आले होते. भाषण संपल्यानंतर व्यासपीठावरुन उतरत असताना त्यांनी हा डान्स केला.

वाघाचे नाव घेणे शोभत नाही, शेळी-मेंढीचे घ्या; राणेंची टीका

औरंगाबाद येथील प्रचारसभा संपल्यानंतर ते व्यासपीठावरुन उतरत होते. त्यावेळी 'मियाँ मियाँ भाई' या गाणे लावले होते. पायऱ्या उतरत असताना लोक ओवेसी यांना पाहून घोषणा देत होते. ते पाहताच ओवेसी हेही उत्साहित झाले आणि त्यांनी डान्स केला. 

तत्पूर्वी, ओवेसींनी आपल्या भाषणात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १९९३ च्या मुंबई दंगलीप्रकरणाचा श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल लागू केला पाहिजे. पंतप्रधान मोदी हे वादग्रस्त विषयांचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित करुन एका खास वर्गाला संदेश देण्यात व्यस्त आहेत.

भाजपच्या मंत्र्यानेच 'चंपा' शब्द तयार केला, अजित पवारांचा गौप्यस्फोट

पंतप्रधान मोदी म्हणतात की, पूर्वीच्या सरकारांनी १९९३ मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील पीडितांना न्याय दिला नाही. पण हे प्रकरण बंद झाले, आरोपींना शिक्षा झाली. तरीही मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल लागू झालेला नाही. पंतप्रधान मोदी कधीपर्यंत यावर काम करणार, असा सवाल त्यांनी केला.

शरद पवार ट्रेंडिंगमध्ये, अनेकांकडून 'साहेबां'ना सलाम!