पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हडपसरमध्ये BJP उमेदवाराच्या रोड शोमध्ये सनी देओल यांची डायलॉगबाजी

भाजप खासदार सनी देओल

आगामी विधानसभा निवडणुकीत बाजी मारुन सत्ता कायम राखण्यासाठी भाजप-सेना महायुतीकडून राज्यभरात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. राज्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दिग्गज नेत्यांनी दंड थोपटल्यानंतर भाजपचे विद्यमान खासदार आणि अभिनेते सनी देओलही आता मैदानात उतरले आहेत. 

पुण्यातील हडपसर मतदार संघातील भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्या प्रचार रॅलीत मंगळवारी सनी देओल यांनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. 'तारिख पे तारिख हा... या आपल्या लोकप्रिय डायलॉगसह त्यांनी २१ तारखेला भाजप उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन हडपसरच्या जनतेला केले. सनी देओल रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Veteran actor and BJP MP Sunny Deol held roadshow in Hadapsar constituency in Pune