पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंचा निर्णय आमच्यासाठी अंतिमः एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस झाले असले तरी राज्यातील सत्ता स्थापण्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दिवसेंदिवस यातील क्लिष्टता वाढताना दिसत आहे. दरम्यान, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय सर्व आमदारांना मान्य असल्याचे म्हटले आहे. 

नोटाबंदीला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आता राहुल गांधी म्हणतात...

ते म्हणाले, सत्ता स्थापण्याचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. त्यामुळे ते योग्य ते निर्णय घेतील. मुंबईबाहेरच्या आमदारांना फक्त रंगशारदामध्ये उतरवल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार निवासाचे काम चालू आहे. त्यामुळे मुंबईबाहेरच्या लोकांना बैठकीस येण्यासाठी रंगशारदामध्ये ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही हलवले नाही: विजय वडेट्टीवार

उद्धव ठाकरे हे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील. त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. सत्ता स्थापण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 uddhav thackerays decision is final for us says eknath shinde