पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..ही तर पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे

कणकवली मतदारसंघात प्रचारासाठी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे खासदार नारायण राणेंवर हल्लाबोल केला. नारायण राणे यांचे नाव न घेता उद्धव म्हणाले, ते पक्षातून गेले नाहीत. त्यांना लाथ देऊन हाकलून दिले होते. ते जेव्हा काँग्रेसमध्ये गेले होते. तेव्हा माध्यमांनी मला प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी सोनिया गांधी आणि काँग्रेसला शुभेच्छा दिल्या होत्या. आज मी भाजपलाही शुभेच्छा देतो, असा टोला त्यांनी लगावला. त्यांनी काँग्रेसची वाट लावली. नंतर स्वतःचा पक्षा काढला त्याचीही विल्हेवाट लावली. आता ते भाजपत गेले आहेत. मी मैत्रीला आणि दोस्तीला जागणारा आहे. ही तर पाठीत वार करणारी औलाद आहे. अशा औलादाची मला सोबत नको, असे ते म्हणाले. दरम्यान, शिवसेनेचे संजय सावंत यांची भाजपचे नीतेश राऊत यांच्याविरोधात लढत आहे. राज्यात महायुती असली तरी कणकवलीत दोन्ही पक्ष आमने-सामने उभी ठाकली आहेत. 

पृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे

ते ज्या ज्या पक्षात गेले त्यांना त्यांनी नंतर शिव्या दिल्या आहेत. आता ते भाजपत आहेत. उद्या ते दुसरीकडे गेली की भाजपलाही शिव्या देतील. करुन करुन भागले आणि राणे देवपुजेला लागले आहेत. मातोश्रीच्या मिठालाही ते जागले नाहीत. भाजपने संदेश पारकर यांना उमेदवारी दिली असती तर आज येथे महायुतीची सभा झाली असती, असे ते म्हणाले.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, संभाजी पूल दुचाकींसाठी खुला

कोकण माझा आहे. या कोकणाचा विकास कोणी रोखू शकत नाही. नाणार प्रकल्पाला आजही सेनेचा विरोध कायम आहे. विनाश करुन विकास करायचा नाही. टीकेसाठी नव्हे तर भाजपला सावध करायला आलोय, असे म्हणत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तोडून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे