आपल्या देशात लोकशाहीच्या नावाने चाललेला हा खेळ लाजीरवाणा आहे. रात्रीस खेळ चालू ठेवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. केंद्रातील कॅबिनेटने पहाटे बैठक घेऊन राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवल्याचे सांगण्यात येते. केंद्राने महाराष्ट्रावर केलेला हा फर्जिकल स्ट्राईक असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरील संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'..अजित पवार अचानक उठले आणि वकिलाकडे जायचं म्हटले'
ते पुढे म्हणाले, जनादेशाचा अनादर केल्याचा आमच्यावर आरोप केला जात होता. त्यांनी जे केले तो जनादेशाचा आदर असतो. ही रात्रीस खेळ चाले नावाची टीव्ही मालिका नाही. तुम्ही माणसे फोडण्याचे काम करता. आम्ही ते सर्वांसमोर बोलून करतो. बिहार, हरियाणामध्ये जे झाले ते महाराष्ट्रात झाले. आमची लढाई ही भाजपच्या 'मी' पणाविरोधात सुरु आहे.
'..अजित पवार अचानक उठले आणि वकिलाकडे जायचं म्हटले'
शिवरायांच्या महाराष्ट्रावर भाजपने फर्जिकल स्ट्राइक केला असून केंद्रातील नेत्यांनी जे केले त्याचा आम्ही निश्चित सूड घेणार असल्याचे ते म्हणाले.
आम्हाला मित्र पक्ष नको, विरोधी पक्ष नको, पक्षातले मित्रही नको, असे भाजपचे धोरण आहे. मर्द मावळे हे नेहमी रणांगणात असतात. रात्रीस खेळ चालू ठेवून सत्ता मिळवता येत नसते. आम्ही कालही एकत्र होतो, आजही एकत्र आहोत आणि उद्याही एकत्र असणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.