पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर नेहरुंनाही वीर जवाहरलाल नेहरु म्हणेन : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (Photo by Satish Bate)

स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना आणि भाजप नव्हती. त्यावेळी काँग्रेसने मोठे योगदान दिले. मात्र सध्या ती काँग्रेस उरली नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मुंबईतील महायुतीच्या संयुक्त प्रचारसभेत ते बोलत होते. जून्या काँग्रेसचे कौतुक करताना त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्यांचा दाखला दिला. शिवसेना प्रमुख सांगायचे की त्याकाळातील काँग्रेसमधील फळी ही  टोलेजंग व्यक्तिमत्व असणारी होती. त्यांची नावे घेतली किंवा ती समोर आली तर आदराने मान खाली जायची. मात्र हल्ली मान खाली जाते पण ती शर्मेने अशा शब्दांत त्यांनी काँग्रसपूर्वीसारखी राहिली नसल्याचे म्हटले.  

सातारा सभा : मुसळधार पावसात उदयनराजेंवर कडाडले शरद पवार

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसला कुणी प्रतिस्पर्धी उरला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर काँग्रसने जूना विचार बाजूला टाकला. निवडणूक म्हणजे जनतेची पिळवणूक करण्याची संधी म्हणून ते सत्तेसाठी लढू लागले. काँग्रेस सत्ताभक्षक झाल्यामुळे काँग्रेस संपली, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपल्यासमोर राजकीय विरोधक नसला तरी जबाबदारी मोठी आहे. बेरोजगारी, गरीबी या देशातील मोठ्या समस्यां आपल्या समोर आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण यावर मात करु. देशाला विकासाच्या दिशेने नेणाऱ्या सरकारमध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा असल्याचे उद्धव ठाकरेंनी आवर्जून उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले. 

'काँग्रेस सरकार जनतेला नियंत्रणात ठेवायचे'

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा भाजपच्या संकल्पातील मुद्दा अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या मुद्यावरुन त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी सावरकरांना पळकूटे म्हटले होते. राहुल गांधींना इतिहास माहित नाही. त्यामुळेच त्यांनी सावरकरांविषयी असे भाष्य केले. लोकसभेतील पराभवानंतर नेतृत्व सोडणारे राहुल गांधीच पळपुटे आहेत. ते पुढे म्हणाले की नेहरुंनी तुरुंगवास भोगला असेल पण सावरकरांनी ज्याप्रमाणे १४ वर्षे तुरुंगवास भोगला तसा तुरुंगवास नेहरुंनी १४ मिनिटे जरी भोगला असेल तर त्यांना मी वीर जवाहरलाल नेहरु म्हणायलाही तयार आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Uddhav Thackeray slam congress leader Rahul Gandhi on remarks over vinayak damodar savarkar bharat ratna