पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धवजींनी माझे फोन उचलले नाहीत, फडणवीसांचा आरोप

देवेंद्र फडणवीस (Photos by Pratik Chorge.)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. चर्चा आम्ही थांबवली नाही. चर्चा त्यांनी थांबवली. उद्धव ठाकरेंना मी स्वतः अनेकवेळा फोन केले. पण त्यांनी एकदाही फोन उचलला नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना आमच्याशी चर्चा करत नव्हती. पण काँग्रेस-राष्ट्रवादीशी त्यांची तीन-तीन वेळ चर्चा होत असत. आमच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नव्हता. 

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

भाजपबरोबर त्यांना चर्चाच करायची नव्हती. त्यांचे हे धोरण योग्य नाही. गैरसमज चर्चेतून संपुष्टात आणता आले असते. मागील पाच वर्षे उद्धव यांच्याशी माझे चांगले संबंध होते. राजकारण वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे, असे फडणवीस म्हणाले. 

आम्ही जोडणारी लोक आहोत, तोडणारी नाही. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी पूजनीय आहेत. गेल्या पाच वर्षांत आणि मागील १० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या शब्दांत टीका केली. आम्ही कधीच युती असताना व नसतानाही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढले नाहीत. केंद्रातही राहायचे, राज्यातही आमच्यासोबत राहायचे आणि आमच्याच नेत्यांवर टीका करायचे हे आम्हाला मान्य नाही. आमच्या मनाला ही गोष्ट लागली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; उद्धव ठाकरे ठाम

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 uddhav thackeray never receive my phone devendra fadnavis alleges