पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमुळे सत्ता स्थापण्यात खोडाः फडणवीस

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमुळेच राज्यात सत्ता स्थापन करता आली नसल्याचा आरोप मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव यांनी आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तो आम्हाला धक्काच होता. त्यांनी असे का म्हटले, हा आम्हाला प्रश्न पडला. उलट मी पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांचे आभार मानले होते, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.

उद्धवजींनी माझे फोन उचलले नाहीत, फडणवीसांचा आरोप

ते पुढे म्हणाले, गेल्या १५ दिवसांत ज्या प्रकारची वक्तव्ये माध्यमांतून पाहायला मिळाली. ती सगळ्यांनी पाहिली आहे. माझ्यासमोर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद या विषयावर निर्णय झाला नाही. उलट एकदा यावर बोलणी फिस्कटली होती. 

येत्या काळात भाजपच राज्यात सरकार बनवेल - देवेंद्र फडणवीस

गैरसमज चर्चेतून संपुष्टात आणता आले असते. मागील पाच वर्षे उद्धव यांच्याशी माझे चांगले संबंध होते. राजकराण वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 uddhav thackeray first press conference responsible for government formation process blame by devendra fadnavis