पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना गाळात घातले, उदयनराजे कडाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले (ANI)

स्वातंत्र्यप्राप्तीपासून काँग्रेसकडे सत्ता आहे. पण काँग्रेसने समाजकारण करण्याऐवजी राजकारण केले. सत्तेमुळे काँग्रेसमध्ये अहंकार आला होता, असा आरोप सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केला. सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उदयनराजे बोलत होते. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. १५ वर्षांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीने फक्त भ्रष्टाचार आणि घोटाळाच केला. त्यांनी फक्त घोषणा केल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना गाळात घालण्याचे काम केले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना या गाळातून बाहेर काढले. गाळातून कमळ उगवले, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले.

उदयनराजे पुढे म्हणाले की, सातारा ही चळवळीची भूमी आहे. या भूमीचे आणि मोदीजींचे पंतप्रधान होण्यापूर्वीपासूनचे संबंध आहेत. काँग्रेसकडे सत्ता असूनही त्यांनी तिचे केंद्रीकरण केले. त्यामुळे मुठभर लोकांच्या हाती सत्ता आली. काँग्रेसने फक्त घोषणा दिल्या. पण पंतप्रधान मोदींनी तळागाळातल्या लोकांच्या हाती सत्ता दिली. मोदी हे 'आयर्न मॅन' असल्याची उपमाही त्यांनी दिली. 

मोदींच्या दूरदृष्टीमुळे सर्वत्र विकास झाला. मराठा समाजाला आरक्षण देत न्याय देण्याचे काम युती सरकारने केला. साताऱ्यात येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कलम ३७० हटवण्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही त्यांनी यावेळी टीका केली. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 udayanraje bhosale slams on congress ncp in pm modi rally