पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पृथ्वीराजबाबांना त्यांच्या घरचीही मतं मिळणार नाहीतः उदयनराजे

उदयनराजे भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण

गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील भाजपचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश करताना उदयनराजे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे साताऱ्याचा विकास झाला नसल्याचे म्हटले होते. चव्हाण यांनी त्यावेळी उदयनराजेंचे सर्व आरोप फेटाळाले होते. आता उदयनराजेंनी पुन्ही चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मागील निवडणुकीत मी जर पृथ्वीराज चव्हाण यांना मदत केली नसती तर ते निवडूनच आले नसते असा दावा, उदयनराजे भोसले यांनी केला आहे. यावेळी तर त्यांना त्यांची घरचीही मते मिळणार नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

..असं बोलण्यापेक्षा मेलेलं बरं: उदयनराजे भोसले

कराड येथील पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजेंवर टीका केली होती. साताऱ्याला अमित शहा किंवा नरेंद्र मोदी कोणालाही आणले तरी उदयनराजे दोन लाख मतांनी पराभूत होतील असे त्यांनी म्हटले होते. त्यांना तर यावेळी त्यांच्या घरच्यांची सुद्धा मते मिळणार नाहीत. ते वयाने मोठे असल्यामुळे मी त्यांचा आदर करतो. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, व मुख्यमंत्री असताना साताऱ्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा व राज्याचा कोणताही विकास केला नाही. त्यांच्याकडे कोणतीही दृष्टी नाही. 

आदित्य ठाकरे भरघोस मतांनी जिंकतील: संजय दत्त

पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांनी फार मोठ्या पदावर काम केले आहे. त्यांचा मी आदरच करतो. परंतु, त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. श्रीनिवास पाटील हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी माझे बारश्याचे जेवण केले आहे. त्यामुळे मी त्यांना प्रतिस्पर्धी मानतच नाही.

मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे