पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..असं बोलण्यापेक्षा मेलेलं बरं: उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले

लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाला पाठिंबा दिल्याचे वृत्त भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहे. गड-किल्ल्यांचे सुशोभीकरण आवश्यक मात्र याठिकाणी हॉटेल, परमिट रूम आदिंना माझा विरोध कायम आहे. या गड-किल्ल्यांकडे शिवमंदिर म्हणून पाहा या गड-किल्ल्यांमुळे स्वराज्याची संकल्पना साकार होऊ शकते. असे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. ते वाई येथे माध्यमांशी बोलत होते. या गड-किल्ल्यांवर डान्सबार करण्याला परवानगी द्यायला हवी, असे मी कसे म्हणेन. असे मी बोललोच नाही. असे बोलण्यापेक्षा मेलेले बरे. असे होणार असेल तर तो वेडेपणाच आहे. मी जे बोललो नाही त्याचे खापर माझ्यावर का फोडता, असे म्हणत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. 

मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे

छत्रपती शिवाजी महाराजंचे गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकारने भाड्याने देण्याच्या निर्णयावर राज्यातून मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर महाराजांच्या समर्थनाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात आले होते. त्यावर उदयनराजे यांनी खुलासा केला. 

मी जे बोललो नाही, त्याचे खापर माझ्यावर का फोडता. अशा पद्धतीची जर बातमी आली असेल तर यापुढे मी पत्रकारांशी बोलणारच नाही. गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळेल. त्यांना रोजगारासाठी इतर जावे लागणार नाही व शासनालाही महसूल मिळेल, अशा अनुषंगाने त्या पत्रकारांच्या प्रश्नावर मी वक्तव्य केले. परंतु त्याचा विपर्यास करून पत्रकाराने स्वतःचे विचार घुसडून ही बातमी केलेली असू शकते.

सावरकरांच्या मुद्द्यावरून मोदींची विरोधकांवर टीका

परदेशामध्ये ज्याप्रमाणे या ऐतिहासिक वास्तूंची व गड किल्ल्यांची जाहिरात होते या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. तर अशा पद्धतीने या गड-किल्ल्यांचा विकास व जाहिरात व्हायला हवी. परंतु त्याचे जे पावित्र्य आहे हे कायम राखणे गरजेचे असल्याचे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. मी कोणाला घाबरत नाही. परंतु नको असलेल्या विषयांवर मी नको ती चर्चा करणार नाही. केली तर मला कधीही, कोणीही, कुठेही विचारू शकतो. परंतु भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी मात्र ठाम आहे, असेही उदयनराजे म्हणाले.