पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक रद्द

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. यामागे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांचे कारण सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत केलेल्या संदिग्ध वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. 

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते या कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली असून कदाचित ती उद्या होण्याची शक्यता आहे.

दिंडीत जेसीबी घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही लवकरच बोलणी होतील असे सांगत बैठकीबाबत पक्षश्रेष्ठींकडून अद्याप आम्हाला काही संदेश आला नसल्याचे सांगितले. पक्षश्रेष्ठींकडून कधीही निरोप येऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Todays meeting between Congress and NCP leaders has been postponed till tomorrow