पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील या प्रतिष्ठित लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी २१ ऑक्टोबरला मतदान पार पडलं, आता निकालासाठी एक दिवस उरला आहे. सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी विधानसभेसाठी दिग्गज नेते उभे आहे. या निवडणुकीच्या रुपानं दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे उद्याच्या निकालाबरोबरच  राज्यातील या प्रतिष्ठित  लढतीकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या लढती कोणत्या ते पाहू 

गेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा?

१) वरळी मतदार संघ 
आदित्य ठाकरे (शिवसेना ) वि. सुरेश माने ( राष्ट्रवादी काँग्रेस)
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता. 

२) वांद्रे पूर्व मतदार संघ 
विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) वि. झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाळा सावंत यांनी भाजपच्या कृष्णा पारकर यांचा १६ हजार मतांनी पराभव केला होता. 

३) येवला 
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) वि. संभाजी पवार (शिवसेना)
२०१४ च्या निवडणुकीत  छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा  ४६ हजार ४४२ मतांनी पराभव केला होता. 

४) बारामती 
अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस ) वि. गोपीचंद पडळकर ( भाजप )  
 अजित पवार यांनी  गेल्या निवडणुकीत भाजपच्या प्रभाकर गावडेंचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. 

खासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...

५) नागपूर दक्षिण पश्चिम 
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप) वि. आशिष देशमुख (काँग्रेस )
गेल्या निवडणुकीत  देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल पाटील यांचा ४८ हजार मतांनी पराभव केला होता. 

६) कोथरुड 
 चंद्रकांत पाटील (भाजप ) वि. किशोर शिंदे (मनसे)
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत  भाजपच्या  मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंचा पराभव केला होता. 

७ ) कणकवली
नितेश राणे (भाजप) वि. सतिश सावंत ( शिवसेना ) 
गेल्या विधानसभा निवडणुकीत  काँग्रेसकडून लढणाऱ्या  नितेश राणे यांनी भाजपच्या प्रमोद  जठार यांचा पराभव केला होता. 

८) कर्जत- जामखेड 
राम शिंदे (भाजप) वि. रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
राम शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश खाडे यांचा पराभव केला होता. 

९ ) परळी 
पंकजा मुंडे (भाजप ) वि. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
याच मतदार संघातून २०१४ साली पंकजा मुंडे निवडून आल्या होत्या. 

नवलेवाडीत EVM मध्ये गैरप्रकार नाही, आयोगाने वृत्त फेटाळले

१०) नालासोपारा 
प्रदीप शर्मा (शिवसेना) वि. क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
२०१४ च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनी भाजपच्या राजन नाईक यांचा ५४, ४९९ हजार मतांनी पराभव केला. 

११) भोकर 
 अशोक चव्हाण (काँग्रेस) वि. बापूसाहेब गोरठेकर (भाजप)

१२) लातूर 
अमित देशमुख (काँग्रेस) वि. शैलेश लाहोटी (भाजप)
२०१४ च्या निवडणुकीत अमित देशमुख यांनी  भाजपच्या शैलेश लाहोटी यांचा पराभव केला होता. 

१३) साकोली 
नाना पटोले (काँग्रेस ) वि. परिणय फुके (भाजप)
या मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या राजेश काशीवार यांनी काँग्रेसच्या सेवकभाऊ वाघये यांचा पराभव केला होता. 

पुढील तीन दिवस पावसाचेच