पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून अजित पवारांनी मागितली माफी

अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर माफी मागितली. प्रसारमाध्यमांसमोर राष्ट्रवादीच्या रणनीतीबाबत बोलताना त्यांनी अनावधानाने दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा आज स्मृतीदिन असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर बैठक झाल्यानंतर पुन्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण अनावधानाने वसंतदादा पाटील यांचा स्मृतीदिन असल्याचा उल्लेख केला होता. पण आज वसंतदादा पाटील यांची जयंती आहे. त्यामुळे मी माफी मागतो, असे अजित पवार यांनी माध्यमांसमोर म्हटले.

..तर तो आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अजित पवारांचे प्रत्युत्तर

बुधवारी सकाळी वायबी चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी अजित पवार हे तिथे आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना गाठून राष्ट्रवादीच्या रणनीतीबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी याबाबत माहिती देताना अजित पवार यांनी आज वसंतदादा पाटील यांचा स्मृतीदिन आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अभिवादन करण्यास जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते बैठकीसाठी निघून गेले.

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा

बैठक झाल्यानंतर ते पुन्हा बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांत प्रथम अनावधानाने केलेल्या वक्तव्याची माफी मागितली आणि वसंतदादा पाटील यांचा आज स्मृतीदिन नसून जयंती असल्याचे त्यांनी सांगितले.

चला चला राष्ट्रपती राजवट आली, दालने सोडण्याची मंत्र्यांची वेळ