पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आकडे इतकेही वाईट नाहीत - संजय राऊत

संजय राऊत

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये आलेले आकडे इतकेही वाईट नक्कीच नाहीत. कधी कधी असे होत असते. आम्ही युती करूनच सत्ता स्थापन करू. ५०-५० चा आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जात आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सचिन सावंत यांच्या 'त्या' ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी सुरू झाली. या निवडणुकीच्या कलांवरून भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळत असले तरी अपेक्षित जागा मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एएनआयशी बोलताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले, आकडे खूप वाईट नाहीयेत. कधी कधी असे होते. आम्ही युती करून पुन्हा एकदा सत्तेत नक्की येऊ. आम्ही ५०-५० चा फॉर्म्युला आधीच निश्चित केला आहे.