पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनतेनं म्हटलंय, माज दाखवाल तर याद राखा, सेनेचा घरचा आहेर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. अब की बार २२० के पार अशी घोषणा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. निकालात भाजप आणि शिवसेनेला गत निवडणुकीपेक्षाही कमी जागा मिळाल्या आहेत. निकालावरुन महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपवर थेट टीका न करता आपल्या धोरणात बदल करण्याचा सूचक इशाराही दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला सत्तेचा उतमात मान्य नव्हता आणि नाही. महाराष्ट्राच्या भावना दडपून कोणाला पुढे जाता येत नाही. मराठी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो, असे म्हणत फार शहाणपणा करु नका. उतू नका, मातू नका. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा, असाच जनादेश आला आहे. हा महाजनादेश नव्हे तर हा फक्त जनादेश आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

वारं फिरलंय, पण महायुती म्हणते आमचं ठरलंय !

शिवसेनेने 'सामना' या आपल्या मुखपत्रातून विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावर भाष्य केले आहे. आपल्या लेखात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक करत भाजपला जमिनीवर येण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या सभांचाही उल्लेख त्यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार उदयनराजे यांच्यावरही टीका करण्यात आली. 

काय म्हटलंय शिवसेनेनं...
महाराष्ट्राच्या जनतेचा कौल स्पष्ट आणि सरळ आहे. उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, असा जनादेश देणारा हा निकाल आहे. ईव्हीएममधून फक्त कमळेच बाहेर येतील असा आत्मविश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होता. पण १६४ पैकी ६३ ठिकाणी कमळे फुलले नाहीत. 

लातूरमध्ये धीरज देशमुखांनी 'नोटा'ला हरवले

काँग्रेसला कोणतेही नेतृत्व नव्हते. बिनधडाच्या काँग्रेसला राज्यात ४४-४५ च्या आसपास जागा मिळाल्या. भाजपने राष्ट्रवादी अशी काही फोडली की पवारांचा हा पक्ष शिल्लक तरी राहील काय असे वातावरण निर्माण झाला. पण महाराष्ट्रात सर्वांत जास्त उसळी राष्ट्रवादीने मारली आहे. 

सत्तेचा उतमात करुन राजकारणात कोणालाही कायमचे संपवता येत नाही आणि हम करे सो कायदा चालत नाही. स्वबळावर भाजपला बहुमत मिळवता आले नाही. 

सोशल मीडियावर रंगली रोहित पवारांच्या या कृतीची चर्चा

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव झाला. शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजे यांचे वर्तन नीतिमत्तेचे असायला हवे होते. छत्रपतींचे नाव घेऊन कुणी अल्टी-पल्टी करत असेल तर चालणार नाही हे सातारकरांनी दाखवले आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात १० सभा घेतल्या. अमित शहा यांनी कलम ३७० वर ४० सभा घेतल्या. मोठ्या विजयाचे स्वप्न भंगले. पण सत्ता राखता इतकेच समाधान. मुख्यमंत्र्यांनी स्वतःला महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पैलवान म्हणून घोषित केले. पण मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे की ते तेल थोडे कमी पडले व मातीतल्या कुस्तीतील वस्ताद म्हणून शरद पवार यांनी गदा जिंकली आहे. महाराष्ट्राच्या भावना दडपून कुणाला पुढे जाता येत नाही व मराठी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही.

'जे ५० वर्षांत झालं नाही ते भाजप-सेना युतीनं करुन दाखवलं'