पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत

अरविंद सावंत (ANI)

शिवसेना नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी सकाळी जाहीर केल्याप्रमाणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदासह ५०-५० फॉर्म्युला ठरला होता. परंतु, भाजपने असे काही ठरलेच नसल्याचे सांगत शिवसेनेला पद देण्यास नकार दिला. निवडणुकीनंतर विश्वासहर्तेला तडा गेला. आपण अशा परिस्थिती दिल्लीत राहू शकत नसल्याने राजीनामा दिल्याचे सावंत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. 

... त्याच्याशी आम्हाला काय घेण-देणं पडलंय?

राजीनामा दिल्यानंतर सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ३० मे रोजी मी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मी गेल्या सहा महिने अवजड उद्योग विभागाचा कार्यभार सांभाळला. पण विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने फॉर्म्युला नाकारला. त्यामुळे विश्वासहर्तेला तडा गेला. ठाकरे कुटुंबीय शब्दाला जागणारे असल्याचे सर्वांना माहीत आहे. माझे नेते उद्धव ठाकरे हे खोटे बोलत असल्याचे चित्र रंगवण्यात आले. अशा वातावरणात मंत्री म्हणून मी काम करणे उचित ठरणार नाही, त्यामुळे आपण राजीनामा दिला.

काँग्रेसचे ठरल्यावरच आमचाही निर्णय - राष्ट्रवादी काँग्रेस

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आमच्या पक्षप्रमुखांना ५०-५० फॉर्म्युलाचा शब्द दिला होता. पण निवडणुकीनंतर हा सामंजस्य करार त्यांनी नाकारला, असेही सावंत म्हणाले. त्याचबरोबर माझ्या राजीनाम्यावरुनच समजून घ्या की आम्ही एनडीएत आहोत की नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Shiv Sena MP Arvind Sawant has tendered his resignation as Union Minister