पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

अरविंद सावंत

शिवसेना नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे? असा सवाल करत सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी आज (सोमवार) सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. सावंत यांनी एकापाठोपाठ एक असे सलग टि्वट करत राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. रविवारी मुंबईत घडलेल्या राजकीय हालचालीनंतर सावंत हे राजीनामा देतात का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. सावंत यांच्या या भूमिकेनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

सावंत पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून शिवसेना फॉर्म्युलानुसार सत्ता वाटप झाले पाहिजे यावर ठाम होती. परंतु, भाजपने सुरुवातीपासूनच नकारघंटा दाखवली. त्यानंतर मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला असा काही शब्द दिलाच नसल्याचे जाहीर केल्यानंतर युतीतील वातावरण आणखी चिघळले. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटेपणाचा आरोप झाल्याचे सांगत आपण व्यथित झाल्याचे म्हटले. त्यातच भाजपने आपण सरकार स्थापण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडल्यास पाठिंब्याबाबत विचार करु असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 shiv sena leader union minister arvind sawant resign from government