पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधी ईडीची आता राष्ट्रपती राजवटीची धमकी, संजय राऊत यांचा आरोप

संजय राऊत

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात सत्ता लवकर स्थापन न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे भाष्य केल्यानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या माध्यमांचा केंद्रबिंदू ठरलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुनगंटीवार यांनी राष्टपती राजवटीची दिलेली धमकी हा जनादेशाचा अपमान आहे. त्यांची ही धमकी घटनाबाह्य आहे. राष्ट्रपती कुणाच्या खिशात नाहीत. आधी राज्यात ईडीची धमकी दिली जात होती. आता राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे सांगितले. 

भाजपपेक्षा शिवसेना बरी, सेनेला पाठिंबा देण्यासाठी दलवाईंचे पत्र

राऊत म्हणाले की, राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. ही धमकी का दिली जात आहे. राष्ट्रपती राजवटीची भाषा का वापरली जात आहे, असा सवाल त्यांनी केला. शिवसेना अखेरच्या क्षणापर्यंत युती धर्मांचे पालन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती राजवट आणून पदाची प्रतिष्ठ करु नये, असा टोलाही त्यांनी लगावला. अशा कुठल्याही धमकीचा शिवसेनेवर परिणाम होत नाही, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. 

'आम्ही विरोधी पक्षात बसावं अशी लोकांची इच्छा'

काँग्रेस नेते हुसेन यांच्या पत्राविषयी बोलताना ते म्हणाले की, दलवाई हे पुरोगामी विचाराचे आहेत. त्यांनी काँग्रेसला शिवसेनेस पाठिंबा देण्याविषयी लिहिलेल्या पत्राचे स्वागत आहे. पण तरीही आम्ही आजही मानतो की, आम्ही निवडणूक ही युतीत लढली आहे, हे सांगताना महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, हे त्यांना ठासून सांगितले.

शहा राहिले दूर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी फोनवर चर्चा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 shiv sena leader sanjay raut speaks on president rule in state bjp sudhir mungantiwar