पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेला कोणी शहाणपण शिकवू नये, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस

राज्यात सत्ता स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. त्याचे पडसाद आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिनावेळी दिसून आले. बाळासाहेबांना अभिवादन करताना भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदुत्त्वावर भाष्य केलेली क्लिप आहे. फडणवीस यांनी या टि्वटच्या माध्यमातून शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या सल्ला दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शिवसेनेला कोणी शहाणपण शिकवू नये, अशा शब्दांत फडणवीसांना फटकारले. 

शरद पवारांचे बाळासाहेबांना टि्वटरवरुन अभिवादन

शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक येत आहेत. सकाळी ११ च्या सुमारास संजय राऊत हे स्मृतीस्थळावर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना फडणवीसांच्या टि्वटबद्दल विचारले असता, राऊत यांनी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला (शिवसेना) कोणी शहाणपण शिकवू नये. योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, असे राऊत म्हणाले.

पीएमसी बँक घोटाळाः भाजप नेत्याच्या मुलाला अखेर अटक

यावेळी राऊत यांनी राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि बाळासाहेबांना उद्धवजींनी जे वचन दिले, ते पूर्ण होईल. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे ठामपणे सांगितले. 

फडणवीस यांनी आपल्या टि्वटमध्ये सेनेला हिंदुत्त्वाची आठवण करुन दिली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 shiv sena leader sanjay raut slams on bjp leader devendra fadnavis