पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

उध्दव ठाकरे

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. दिवसेंदिवस यातील गुंता वाढत चालला आहे. काँग्रेसकडून अजून कोणताच निरोप न आल्याने राष्ट्रवादीने सोमवारी शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले नाही असे बोलले जात आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे राज्यपालांनी सत्ता स्थापण्यासाठी शिवसेनेला दिलेली वेळ सोमवारी सांयकाळी ७.३० वाजता संपुष्टात आली. राज्यातील सत्ता स्थापण्यास काँग्रेसमुळे उशीर होत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडावी यांनी मात्र पुढील सरकार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे येणार असून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

शरद पवार यांनी लीलावतीमध्ये घेतली संजय राऊतांची भेट

राज्यात सरकार स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. याचा शेवट सकारात्मकच होईल. वैयक्तिकरित्या मला असे वाटते की, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी म्हटले. 

'महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे'

तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकवाक्यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा शक्य नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत निवडणूक लढवली. त्यामुळे आम्हा दोघांना एकत्रच निर्णय घ्यावा लागेल. सोमवारी आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. पण त्यांचे आमदार जयपूरमध्ये आम्ही इकडे, त्यामुळे लवकर संवाद होत नाही. काँग्रेस सोबत आलीच तरच मार्ग निघू शकतो, असेही ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Shiv Sena Congress NCP parties will form the Govt and a Shiv Sena leader will be the CM says congress leader