पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने शिवसेनेकडून बैठक रद्द'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सत्तेत ५०-५० टक्केचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. इतकेच नव्हे तर सत्ता समीकरणासाठी भाजप-शिवसेनेत होणारी बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हे माहिती दिली. 

मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाहीः संजय राऊत

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत ५०-५० टक्केंचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसारच लोकसभा आणि विधानसभेत युती झाली होती. आज ते म्हणत आहेत की, असे काही ठरलेच नव्हते. मग असे काही ठरलेच नव्हते तर चर्चा करण्यास काहीच अर्थ नाही, असे उद्धव ठाकरेंना वाटले आणि त्यांनी बैठक रद्द केली. जे ठरले होते ते आम्हाला द्या, त्याचीच आम्ही मागणी करतोय, असेही ते म्हणाले.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता- फडणवीस

मुनगंटीवार यांनी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असल्याचे म्हटले होते. त्यावर राऊत म्हणाले की, त्यांच्याकडे दुसरा पर्यायही असेल. कारण जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्याकडे दुसरा पर्याय हा मेहबूबा मुफ्ती होत्या. नंतर त्या देशद्रोही ठरल्या. त्याप्रमाणेच त्यांच्याकडे पर्याय असेल.

शिवसेनेचे ४५ आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, संजय काकडेंचा दावा

यावेळी त्यांनी संजय काकडे यांच्यावरही निशाणा साधला. संजय काकडे कुठल्या पक्षाचे खासदार आहेत. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत का. अशा बातम्या मुद्दामहून पेरल्या जातात. राष्ट्रवादीचे त्यांनी आमदार फोडले. आज काय झाले त्याचे, आपण पाहतो. त्यामुळे काकडेंकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ते पुढच्यावेळी खासदार तरी असतील का नाही, याची शाश्वती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसकडून 'या' स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न देण्याची मागणी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 shiv sena cancel meeting with bjp after cm statement says sanjay raut