राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वादावर भाष्य केले आहे. बहिणाबाई असा उल्लेख केल्याने आपल्याला यातना झाल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटल्याची क्लिप मी पाहिली. पण बहिणाबाई या नावातच आदर आहे. यात यातना देण्यासारखे काय आहे. बहिणाबाई नावाच्या मोठ्या कवियत्री होऊन गेल्या. त्यांच्या अनेक कविका आम्ही घोकल्या आहेत. त्यांनी अनेक विचार मांडल्याचे ते म्हणाले.
गडचिरोलीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा मृत्यू
३०-४० मिनिटे भाषण करताना काय होत नाही आणि शेवटी चक्कर येते. यामागे काहीतरी आहे असे वाटते. मतदानात काही वेगळे निकाल लागतात, त्यासंबंधीची अस्वस्थता आहे की नाही याची माहिती नाही.
धनंजय मुंडे यांच्या बहिणाबाई हे वक्तव्य आक्षेप घेण्यासारखे आणि गंभीर हे असे मला वाटत नाही. आपले वक्तव्य मोडतोड करुन दाखवल्याची त्यांची तक्रार आहे, असे ते म्हणाले. 'एबीपी माझा'शी पोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
बोगस मतदारांवरुन बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात जुंपली
दरम्यान, निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, नव्या पिढीच्या अपेक्षा या परिवर्तनाला अनूकुल अशा आहेत. भाजपकडून अपेक्षांची पूर्तता होईल असे वाटत होते. दोन ते तीन क्षेत्रात राज्य खूप खाली घसरले आहे. शेतकरी आत्महत्या, उद्योगधंदे बंद पडले आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.