पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सातारा सभा : मुसळधार पावसात उदयनराजेंवर कडाडले शरद पवार

शरद पवार

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी सुर असलेला प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यातील सभेत तुफान पाऊस पडत असताना जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन लोकसभेसाठी पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर तोफ डागली. 

पुण्यातील कोथरुडच्या सभेत राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

भर पावसात जनतेला संबोधित करताना पवार म्हणाले की, उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी वरुण राजाने आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार घडणार आहे. चूक झाली तर ती कबूल करायला हवी. लोकसभेच्या निवडणुकीत साताऱ्यातील उमेदवारी देताना माझ्याकडून चूक झाली. श्रीनिवास पाटील यांना मताधिक्याने निवडून देत ही चूक भरुन काढायची आहे. उल्लेखनिय आहे की, उदयनराजे भोसले २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

कलम ३७० वर मनमोहन सिंग यांच्या विधानावरून काँग्रेस अडचणीत

आगामी विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेची पोट निवडणूक पार पडणार आहे. उदयनराजे भोसले भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरले असून राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येऊन गेले. याचा उल्लेख करत शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. यंदाच्या निवडणुकीत मजा नाही. कोणी पैलवानच उरला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मी त्यांना उत्तर दिले आहे. २४ तारखेला त्यांना जनतेचे उत्तर मिळेल, असे पवार यावेळी म्हणाले. मुसळधार पाऊस पडत असताना देखील सभेला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 sharad pawar rally satara heavy rain critics bjp and udayanraje