पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलग १४ वेळा निवडून आलेला 'माय का लाल दाखवा', पवारांचे शहांना आव्हान

अमित शहा आणि शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शहांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा त्यांना चांगलाच समाचार घेतला. देशाचे गृहमंत्री म्हणतात शरद पवार यांनी ५० वर्षांत काय केलं? त्यांना एकच प्रश्न करतो की, तुमच्यातील एक 'माय का लाल दाखवून' द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल, असे आव्हानच त्यांनी अमित शहांना दिले. 

शिवसेनेचा वचननामा जाहीर, १ रुपयांत आरोग्य चाचणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज (शनिवार) बार्शीमध्ये सभेला संबोधित केले. राज्याच्या राजकारणात बदल करण्यासाठी मी लोकांशी संपर्क साधतो आहे. काही लोक विकासाचे नाव सांगून सोडून गेले. बार्शीकर अशा पळपुट्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीसोडून शिवसेनेकडून उभे असलेले माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर टीक केली. 

'अश्रू खरे असतील तर बाळासाहेबांच्या अटकेबद्दल माफी मागा'

हे शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करून सत्तेत आले. सत्तेत आल्यावर अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बांधण्याचे आश्वासन खोटे ठरले. महाराजांची परंपरा जपणारे गडकिल्लेही पर्यटनासाठी खुले केले. हीच किल्ल्यांची प्रतिष्ठा तुम्ही करता?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह हातवारे केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात इथे सक्षम विरोधक नाहीत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवनाशी होते, इतरांशी नाही. जर सत्ताधाऱ्यांच्या मते इथे काही ताकदीच्या निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात?

तिसरा विरोधी पक्ष प्रॅक्टिकल विचारांचा, फडणवीसांचा 'मनसे' टोला

मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना लहान पोरंटोरं समजू लागले आहेत.

राज्य करायचंय की स्वयंपाक

आता ऐकायला येतंय की १० रुपयांत जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत.

मावळकरांसारखी हिंमत दाखवून रोहित बाबूंच पार्सलही परत पाठवा!