पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भोसरीः मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मृत अब्दुल रहीम नूरमहम्मद शेख

गडचिरोलीमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये मतदानासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अब्दुल रहीम नूरमहम्मद शेख (वय ६२) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मतदानासाठी मतदान केंद्रात गेले असता त्यांची अचानक तब्बेत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गडचिरोलीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) दुपारी मृत अब्दुल रहीम नूरमहम्मद शेख हे मतदान करण्यासाठी आपल्या कुटुंबासह भोसरी येथील महात्मा फुले शाळेत आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्वरीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेख हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.