पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होताः दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह (ANI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात (संकल्प पत्र) भाजपने स्वातंत्र्यसैनिक वि दा सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यांच्या मते, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सावरकर यांचे नाव समोर आले होते. त्यांच्या जीवनात दोन पैलू होते. ते इंग्रजांना माफी मागून परत आले होते, असेही त्यांनी म्हटले. 

सावरकरांच्या मुद्द्यावरून मोदींची विरोधकांवर टीका

झाबुआ मतदरासंघातील उमेदवार कांतिलाल भूरिया यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते अलिराजपूर येते आले होते. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले, सावरकर यांच्या जीवनाचे दोन पैलू होते. ते स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात सहभागीही झाले आणि इंग्रजांची माफीही मागून ते परत आले होते. महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटातही त्यांचे नाव आले होते.

सावरकर, सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न'साठी प्रयत्न करणार, भाजपचा शब्द

यापूर्वी, काँग्रेस प्रवक्ते आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवाही यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या मागणीवर निशाणा साधला होता.  महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेलाही हा सन्मान देण्याची मागणी का नाही करत? असा सवाल त्यांनी केला. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षी भाजपच्या नेतृत्वाने यावर गंभीरपणे विचार करायला हवा, असेही ते म्हणाले होते.

महात्मा गांधींच्या हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या एका चौकशी आयोगाला सावरकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना या कटाबाबत आधीपासून माहीत होते, अशी माहिती मिळाली होती, असेही मनीष तिवारी यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 savarkar bharatratna bjp manifesto congress digvijaya singh