पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

साताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार

लोकसभा निवडणूक मतमोजणी (संग्रहित छायाचित्र)

राज्यात गुरुवारी सकाळी एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारणतः दुपारपर्यंत सर्वच ठिकाणचे निकाल लागण्याची शक्यता आहे. परंतु, सातारा जिल्ह्यातील निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी माध्यमांना दिली आहे. 

साताऱ्यामध्ये विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे येथील निकाल लागण्यास इतर ठिकाणांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. 

'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा

सातारा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. येथील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करत अवघ्या चार महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर ते पुन्हा भाजपकडून येथे उभे आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली नव्हती. नंतर आयोगाने येथील लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. 

राज्यातील या प्रतिष्ठित लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष

सातारा येथील प्रचारसभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसात केलेले भाषण प्रचंड गाजले होते. त्यामुळे येथील लढत चुरशीची ठरणार आहे. शिवेंद्रराजे हेही भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात आहेत.

गेल्यावेळी पहिला निकाल पर्वतीचा, यावेळी कोणत्या मतदारसंघाचा?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 satara election counting will take 12 hour time says collector