भाजपकडून सत्ता स्थापण्यासाठी गुंडांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यात उडी घेत आम्ही गुंडांचा वापर कुठे केला ते राऊत यांनी सांगावे, असे आवाहन केले आहे. 'कुठे आम्ही गुंडांचा वापर केला.. कुणाला धमकी दिली. कोणी दादागिरी दाखविली की पोलिसांनी त्यांच्या लोकांना धरलं आणि आमच्याकडे आणा, असे सांगितले. मला काही कळतच नाही. संजय राऊत असे का बोलतात. त्यांनी एखादे तरी उदाहरण दाखवून द्यावे. मग त्यावर बोलता येईल,' असे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले.
'शोले' चित्रपटातील किस्सा सांगत भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
महाजन म्हणाले, संजय राऊतांनाच बोलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे ते बोलताहेत. पण युतीत पुन्हा ताणतणाव होईल असे बोलणे योग्य नाही. आमच्या पक्षाने बोलण्याचा कुठलाही अधिकार दिला नसल्याने आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. सत्ता स्थापनेसाठी अजून ९ तारखेपर्यंत मुदत आहे. तोपर्यत योग्य तोडगा निघेल,' असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युतीबद्दल संजय राऊत यांची मतं वैयक्तिकः राम कदम
भाजपने मागील दहा दिवसांत गुंडांचा वापर करुन आमदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राऊत त्यांनी केला होता. लवकरच याची माहिती समोर आणणार असल्याचे सांगत भाजपचे राजकारण हे गुंडांपेक्षाही घाणरेडे असल्याचे त्यांनी म्हटले होते. सत्यासाठी महाराष्ट्राने नेहमी बलिदान दिलेले आहे. देवासमोर तुम्ही खोटे बोलता हे चालणार नाही. ईडी वगैरे हे सर्व बुमरँग ठरले. ते महाराष्ट्रात चालणार नाही. खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवलेले आहे. राज्यातील जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवाय, असेही राऊत यांनी म्हटले होते.