पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा

संजय राऊत

राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना यंदा १०० चा आकडा पार करणार असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेने १२४ जागेवर उमेदवार उभे केले आहेत तर २ जागी उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे १२६ जागांवर शिवसेनेचे उमदेवार आहेत. त्यामुळे शिवसेनेने अब की बार १०० पार हे ध्येय ठेवल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते. शिवसेनेशिवाय भाजप राज्य करु शकणार नाही, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये? 

ते म्हणाले, एक्झिट पोल हे आपापल्या पद्धतीने काम करत असतात. पण आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतो तेव्हा आम्हाला अंदाज येतोच. निकाल पुन्हा एकदा भाजप-सेनेच्या बाजूने लागणार आहे. शिवसेना १०० जागांवर विजयी होईल. अब की बार १०० हे ध्येय आम्ही ठेवले आहे. महायुती २००च्या वर जाणार हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.

भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात १८ दहशतवादी ठार

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला पर्याय नाही. त्यांनी दोन-चार जागा जास्त लढल्या तरी त्यांना आमच्या शिवाय पर्याय नाही. त्यांनी १६४ जागा लढल्या आहेत. त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळणारच, असेही त्यांनी म्हटले.

प्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर