पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आठवलेंचा नवा फॉर्म्युला, राऊत म्हणाले..तर विचार करु

रामदास आठवले (ANI)

राज्यात ५०-५० फॉर्म्युला भाजपला मान्य नसल्यामुळे ३० वर्षांपासूनची शिवसेनेबरोबरील युती संपुष्टात आली. मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेचा दावा भाजपने फेटाळली. त्यामुळे शिवसेनाही आता काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, भाजप-शिवसेनेची युती तुटू नये यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्नात असलेले रिपाइं प्रमुख तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवा फॉर्म्युला समोर आणला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजप यासाठी तयार असेल तर विचार करु, असा शब्द दिल्याची माहिती स्वतः आठवले यांनीच दिली आहे. 

राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. त्यासाठी शिवसेनेचे सर्व खासदार दिल्लीत आहेत. याचदरम्यान आठवले यांनी राऊत यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले. 

धोनीमुळेच शतक हुकलं होतं, तीन धावांची 'गंभीर' कहाणी

आठवले म्हणाले की, मी संजय राऊत यांच्याशी यावर चर्चा केली. त्यांना थोडी तडजोड करण्यास सुचवले आहे. मी त्यांना ३-२ वर्षांचा फॉर्म्युला सांगितला. ३ वर्षे भाजप आणि २ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असा तो फॉर्म्युला आहे. जर भाजप यासाठी सहमत असेल तर शिवसेना त्यावर निश्चितच विचार करेल. मी आता याबाबत भाजपशी बोलणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 Ramdas Athawale suggested new 3 2 formula for bjp shiv sena